ठळक घडामोडी

घराघरात ठाकरे शिवसेनेची साद; पावशी मतदारसंघात विजयाचा विश्वास!

अमरसेन सावंत-नारायण मांजरेकर-चित्रा पावसकर यांच्या प्रचार फेरींना उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ : प्रतिनिधी
        पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांच्या झंझावाती प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठाकरे शिवसेनेची हि लाट गावागावात उमटत आहे, आणि हा केवळ प्रचार नाही; हा विश्वासाचा, वारसाचा आणि संघर्षाचा आवाज आहे, असा ठोस संदेश जि.प.चे उमेदवार अमरसेन पुष्पसेन सावंत यांनी दिला आहे.
      प्रचार फेरीदरम्यान बोलताना अमरसेन सावंत म्हणाले, मी तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून काम करताना सामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. रस्ते, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांवर प्रामाणिकपणे काम केले. माझ्या वडिलांचा माजी आमदार स्व. पुष्पसेन सावंत – सामाजिक कार्याचा वारसा मी फक्त नावापुरता नाही, तर कृतीतून पुढे नेला आहे, असे श्री. सावंत यांनी सांगितले.
       ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत असून विविध सामाजिक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याने, सामान्य माणसाच्या वेदना आणि प्रश्न मला प्रत्यक्ष अनुभवातून माहीत आहेत, असेही श्री. सावंत म्हणाले.ही निवडणूक खुर्चीसाठी नव्हे, तर जनतेच्या विश्वासाची लढाई आहे. मला पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
         मतदारसंघात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात अमरसेन सावंत, डिगस पंचायत समिती उमेदवार नारायण उर्फ आप्पा मांजरेकर, आणि पावशी पंचायत समिती उमेदवार चित्रा पावसकर यांनी घराघरांतून थेट संपर्क साधत जनतेशी संवाद साधला. वचननामे पोहोचवणे, गाठीभेटी, बैठका आणि प्रचारफेऱ्या या माध्यमातून पक्षाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यात आला आहे. हा प्रचार केवळ जाहीरनाम्यांचा नव्हे, तर जनतेशी झालेल्या निष्ठावान संवादाचा, संघर्षाचा आणि कार्याचा पुरस्कार आहे,असे अमरसेन सावंत यांनी सांगितले. माजी आमदार वैभव नाईक, माजी खासदार विनायक राऊत, आमदार महेश सावंत यांनीही मैदानात उतरून प्रचार अधिक ठोस बनवला आणि रणनितीची आखणी केली.
         आज गुरुवारीही पावशी जि.प. मतदारसंघात झंझावाती प्रचार फेऱ्यांचा झंझावात सुरू होता. ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पावशी मतदारसंघात आम्हाला वाढता पाठिंबा मिळत असून ठाकरे शिवसेनेचा विजय निश्चित आहे, असा ठाम विश्वास अमरसेन सावंत, नारायण मांजरेकर आणि चित्रा पावसकर यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!