ठळक घडामोडी

मुळस–हेवाळेत बिबट्याचा धुमाकूळ; गोठ्यात घुसून वासराचा फडशा

ग्रामस्थांत भितीचे वातावरण; वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी

दोडामार्ग : प्रतिनिधी
     तालुक्यातील मुळस–हेवाळे परिसरात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ वाढत असताना बिबट्या वाघाने थेट मानवी वस्तीत शिरकाव करत एका शेतकऱ्याच्या घरालगत असलेल्या गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. या घटनेत शेतकरी मनवेल लोबो यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेने परिसरातील ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
     सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वनविभाग व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृत वासराचा पंचनामा करण्यात आला असून संबंधित शेतकऱ्याला तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याच परिसरात महिनाभरापूर्वीही अशाच प्रकारची घटना घडली असून, वनविभागाने बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

error: Content is protected !!