ठळक घडामोडी

आनंदव्हाळ–कर्लाचाव्हाळ येथे लोकसहभागातून वनराई बंधारा!

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत परिसर स्वच्छता व जलसंवर्धन

कदमवाडी येथे उभारला वनराई बंधारा; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

मालवण : प्रतिनिधी
     मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत आनंदव्हाळ–कर्लाचाव्हाळ यांच्या वतीने लोकसहभागातून कदमवाडी येथे वनराई बंधारा उभारण्यात आला. पाणी साठवणूक व जलसंवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला असून, त्याचबरोबर ग्रामपंचायत कार्यालय तसेच गावातील परिसराची स्वच्छता करण्यात आली.
     या उपक्रमावेळी सरपंच रश्मी टेंबुलकर, उपसरपंच दिलीप गोवेकर, ग्रामपंचायत अधिकारी लक्ष्मण सरमळकर, माजी सरपंच रवींद्र टेंबुलकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष चंद्रकांत घाटगे, ग्रामपंचायत सदस्य श्रुती सुकाळी, अनिल सुकाळी, अनंत नांदोस्कर उपस्थित होते. तसेच शिक्षिका स्मिता चौकेकर, अंगणवाडी सेविका विलासिनी सुकाळी, मदतनीस अन्वी सडवेलकर, शिवराम सांडव, विद्यार्थी सान्वी सडवेलकर, भार्गव मांजरेकर, ग्रामपंचायत कर्मचारी विजय चव्हाण, केंद्रचालक प्रिशा बांदल, कर्मचारी अवंतिक सांडव यांच्यासह ग्रामस्थ रमेश बांदल, दुर्गेश परब, गौरव कदम, मनोहर बांदल, लाजरी परब, चिन्मय परब, तनिष बांदल आदी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जलसंवर्धनास चालना मिळाली असून गावाच्या स्वच्छतेसाठीही सकारात्मक संदेश देण्यात आला आहे.

error: Content is protected !!