ठळक घडामोडी

आयडियल इंग्लिश मिडियम स्कूलचे नाव जिल्हाभर गाजतेय – रुपेश पावसकर

नेरूरच्या आयडियल स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त स्पर्धांची रेलचेल

‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेत मेघा राणे प्रथम

कुडाळ : प्रतिनिधी
     जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नेरूर येथील आयडियल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये महिला पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये महिला पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.
विशेष आकर्षण ठरलेल्या ‘खेळ पैठणीचा’ या स्पर्धेत प्रथम क्रमांकाची पैठणी सौ. मेघा अमित राणे यांनी पटकावली. द्वितीय क्रमांक सौ. श्रुती स्वप्नील नेरूरकर तर तृतीय क्रमांक सौ. मधुश्री वासुदेव नाईक यांना मिळाला.
    स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे नेरूरचे नूतन जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर, सौ. रुद्रा पावसकर आणि श्री. कल्पेश पावसकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी बोलताना रुपेश पावसकर यांनी आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल नेरूरचे नाव सध्या जिल्हाभर गाजत असल्याचे सांगितले. विविध एकांकिका स्पर्धांमध्ये शाळेने उल्लेखनीय यश मिळविले असून सावंतवाडी येथे झालेल्या मालवणी करंडक स्पर्धेतही शाळेने मानाचा करंडक पटकावल्याचे त्यांनी नमूद केले. शाळेची प्रगती पाहून अनेक विद्यार्थी येथे प्रवेश घेण्यास उत्सुक असून भविष्यात शाळेला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आपण नक्की सहकार्य करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
या स्पर्धांसाठी सर्व बक्षिसे रुपेश पावसकर यांनी पुरस्कृत केली होती. प्राचार्य सौरभ पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता राणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगिता म्हाडदळकर, भूषण सारंग, चैतन्या चव्हाण, भक्ती फोंडेकर, धनश्री मेस्त्री, श्रद्धा गोसावी, प्रतीक्षा दळवी, कीर्ती चव्हाण, करिष्मा खानविलकर, मिलिंद नाईक, वैभव आकेरकर व अपर्णा म्हापणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!