ठळक घडामोडी

मालवणमध्ये १९ मार्चला स्वागत यात्रेनिमित्त वेशभूषा स्पर्धा!

गुढीपाडव्याला हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीचा पुढाकार

मालवण : प्रतिनिधी
     हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने मालवण शहरात गुढीपाडव्याच्या दिवशी 19 मार्च रोजी सायंकाळी 5 वा. मालवण बाजारपेठ मार्गांवरून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निघणार आहे. यावर्षी स्वागत यात्रेचे 23 वे वर्ष आहे. दर वर्षी प्रमाणे हिंदूप्रेमी व मालवणवासीय यांच्या उत्स्फूर्त सहभागातून भव्यदिव्य स्वरूपात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निघणार असून त्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.
     घोडे, चित्ररथ, देखावे, कोल्हापूर येथील मर्दानी खेळ, नेरूर येथील शिमगोत्सव, विविध वेशभूषा यांसह ढोल ताश्याच्या गजरात भगव्या उत्साहात स्वागत यात्रा निघणार आहे.
     हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निमित्ताने याही वर्षी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बालवाडी ते चौथी, पाचवी ते दहावी असे बाल गट व शालेय गट असणार आहेत. तर खुल्या गटात पुरुष व महिला असे दोन गट असणार आहेत. चार गटात ही स्पर्धा होणार असून प्रत्येक गटातील विजेत्या पाच स्पर्धकांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.
    तरी स्पर्धकांची नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी बंटी केनवडेकर मोबा : 9422596682, अनिकेत फाटक : 9421046390, अमिता निवेकर : 9923921507 यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती संयोजक अमित खोत व भाऊ सामंत यांनी केले आहे.

error: Content is protected !!