ठळक घडामोडी

दोडामार्गात वाळू अभावी घरकुलांची कामे थांबली

दोडामार्ग : प्रतिनिधी
   दोडामार्ग तालुक्यात मंजूर झालेल्या घरकुलांच्या बांधकामाला आवश्यक तेवढी वाळू उपलब्ध नसल्याने अनेक लाभार्थ्यांचे काम ठप्प झाले आहे. पंचायत समितीकडून घरकुल लाभार्थ्यांवर बांधकाम सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा होत असला तरी वाळूअभावी प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे तात्काळ वाळू उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी तहसील कार्यालयात १७ डिसेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्याचे लेखी निवेदन स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी तहसीलदार यांना दिले आहे.
    दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, दोडामार्ग तालुक्यात अनेक घरकुले मंजूर असून लाभार्थ्यांना बांधकाम सुरू करण्यास प्रशासनाकडून सूचना देण्यात येत आहेत. परंतु वाळू उपलब्ध नसल्याने घरकुल बांधकामाची गती मंदावली आहे. पर्यायी कोणताही स्रोत उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून आवश्यक वाळू उपलब्ध करून द्यावी व घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल या मागणीसाठी स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी बुधवारी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचे निवेदन तहसीलदार यांना दिले आहे.

error: Content is protected !!