विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप
उद्योजक रुपेश धुरी व कार्यकर्त्यांचा पुढाकार
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त साळगाव येथील शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. हा उपक्रम उद्योजक रुपेश धुरी यांच्या माध्यमातून तसेच आ. निलेश राणे समर्थक कार्यकर्त्यांच्या वतीने राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच गजानन पवार, वैभव पवार, अमेय धुरी, मनोज पवार, श्रीपाद नाईक आदी उपस्थित होते.









