ठळक घडामोडी

कुडाळ तालुक्यात ४० उमेदवारांची माघार; महायुती विरुद्ध ठाकरे सेनेची थेट लढत

अर्ज माघारीनंतर कुडाळात राजकीय चित्र स्पष्ट; महायुती–मविआ आमने-सामने

उमेदवारांच्या माघारीनंतर थेट लढतींना रंग, २७ जागांसाठी ६७ उमेदवार रिंगणात

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने तालुक्यातील राजकीय चित्र अधिक स्पष्ट झाले आहे.
    तहसीलदार कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जिल्हा परिषद मतदारसंघातून २१ तर पंचायत समिती मतदारसंघातून १९ अशा एकूण ४० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
     दरम्यान, कुडाळ तालुक्यात बहुतांश ठिकाणी महायुती विरुद्ध ठाकरे सेना महाविकास आघाडी अशीच थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जि.प.व पं.स.च्या २७ जागांसाठी ६७ उमेदवार रिंगणात राहीले आहेत. नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघातून ठाकरे सेनेचे उमेदवार विजय लाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे या मतदारसंघात आता महायुतीचे संजय पडते विरुद्ध अपक्ष उमेदवार रूपेश पावसकर यांच्यात थेट सामना रंगणार आहे. अर्ज माघारीनंतर उमेदवारांची अंतिम यादी निश्चित झाल्याने प्रचाराला अधिक वेग येणार असून पुढील काही दिवसांत राजकीय हालचालींना आणखी उधाण येण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!