ठळक घडामोडी

पिंगुळीच्या गोपाळ सावंतचा सीआरपीएफ पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास!

फुटपाथवर भाजी विक्री करणाऱ्या आईच्या कष्टांना आले यश

कुडाळमध्ये गुलालाची उधळण करीत गोपाळवर अभिनंदनाचा वर्षाव

Play
https://youtube.com/shorts/3Jw6pT_wJSU?feature=share

कुडाळ : प्रतिनिधी
     कुडाळ तालुक्यातील पिंगुळी शेटकरवाडी येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील गोपाळ सत्यवान सावंत या युवकाची सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स (सीआरपीएफ) मध्ये निवड झाली असून ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे. कुडाळ बाजारपेठेत नगरपंचायत कार्यालयासमोरील फुटपाथवर भाजी विक्री करणाऱ्या सौ. अनुराधा सावंत यांचा गोपाळ हा मुलगा असून आईच्या अथक कष्टांना आणि स्वतःच्या जिद्दीला यश आले आहे. सीआरपीएफमध्ये निवड झाल्याचे समजताच गोपाळ थेट बाजारपेठेत आईकडे गेला व तिला आनंदाची वार्ता दिली. हा क्षण पाहून आई अनुराधा सावंत भावूक झाल्या. यावेळी मित्रांनी पुष्पवृष्टी व गुलालाची उधळण करत गोपाळचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!