ठळक घडामोडी

मालवणात मधमाशांचा थरारक हल्ला; बालकासह पाच ते सहा जण जखमी!

मालवण : महेश कदम
      मालवण देऊळवाडा येथील मधमाश्यांच्या हल्ल्यात एका बालकासह सहा जण जखमी झाले. ही घटना आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली असून जखमीवर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबतची माहिती मिळताच बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर व सामाजिक कार्यकर्ते मोहन वराडकर यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली.
     मालवण देऊळवाडा प्राथमिक शाळेच्या नजीकच्या झाडावरून मधमाश्याचे पोळे भररस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी स्वाराच्या अंगावर कोसळले. यात प्रथम चेतन विजय देसाई (वय 40 रा. देऊळवाडा), अंकित मराळ यांच्यावर मधमाश्यानी हल्ला केला. त्यानंतर कार्तिक अनिल परसे (वय 14 रा.कुंभारमाठ, सौ. कांचन अनिल परसे (वय 39), किरण धामापुरकर (वय 32), हेमलता धामापुरकर (वय 60) यांच्यावर मधमाश्यानी हल्ला केला. असे पाच ते सहा जणांना मधमाश्यांनी जखमी केले. या मधमाश्या नजीकच्या शाळेत देखील शिरल्याने विद्यार्थी व शिक्षक यांची तारांबळ उडाली. आज सोमवारचा आठवडा बाजार असल्याने या ठिकाणाहून येणाऱ्या नागरिकांना देखील मधमाश्यानी जखमी केले. यातील काहीजण खाजगी रुग्णालयात दाखल झाले तर काही नागरिक मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ बालाजी पाटील यांनी उपचार केले.

error: Content is protected !!