ठळक घडामोडी

दादरमध्ये क्रेडाई सिंधुदुर्ग आयोजित ‘कोकण प्रॉपर्टी प्रदर्शन 2026’चे उद्घाटन उत्साहात!

1000+ प्लॉट्स, 250+ बंगलोज; पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद

सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील प्रॉपर्टींना मुंबईत मोठे व्यासपीठ

मुंबई : प्रतिनिधी
        क्रेडाई सिंधुदुर्ग आयोजित “कोकण प्रॉपर्टी प्रदर्शन 2026” या वास्तू प्रदर्शनाचे उद्घाटन दादर (प.) – मुंबई छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील क्रीडा भवन मैदानावर उत्साहात पार पडले.
     या प्रदर्शनाचे उद्घाटन क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ कार्यकारी सदस्य रसिक चौहान, राज्य उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, खजिनदार सुरेंद्र भोईटे, सहसचिव शहाजी पाटील, सहखजिनदार दशरथ शेट्ये, क्रेडाई सिंधुदुर्ग अध्यक्ष गजानन कांदळगावकर, सचिव अभिजित जैतापकर, खजिनदार अनिल साखळकर यांच्यासह विजय प्रभू, पप्पू नाईक, अभय वालावलकर, विजय तेंडुलकर, ब्रिजेश कोठावळे, पप्पू पाटणकर, संकेत महाडिक, कुंदन केसरकर, उद्धव साखळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
     या प्रदर्शनात 25 हून अधिक नामांकित बिल्डर्स सहभागी झाले असून, 1000 पेक्षा अधिक प्लॉट्स, 250 हून अधिक बंगलोज, तसेच शॉप्स, ऑफिसेस आणि 400 पेक्षा अधिक एन.ए. प्लॉट्स यांचे विविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने नागरिक, गुंतवणूकदार व ग्राहकांनी भेट देत कोकणातील प्रॉपर्टींमध्ये विशेष रस दर्शविला. मुंबईत राबविण्यात आलेल्या व्यापक जाहिरात मोहिमेमुळे प्रदर्शनाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, पुढील दोन दिवसांतही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
या प्रदर्शनामुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील प्रॉपर्टींना मुंबईतील ग्राहकांपर्यंत थेट पोहोच मिळत असून, कोकणातील रिअल इस्टेट क्षेत्राला मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत हे प्रदर्शन सुरू आहे. मुंबईकरांचा प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

error: Content is protected !!