कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील मोरे येथे दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने आज शनिवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कु. विराली विठ्ठल रेमुळकर (वय १६) ही वाडोस हायस्कूलमध्ये दहावीमध्ये शिक्षण घेत होती. अभ्यासाच्या ताणतणावातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे. सध्या दहावीच्या परीक्षा सुरू असून,आज शनिवारी सायंकाळी तिने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे समजते. घटनेची माहिती स्थानिकांनी फोनद्वारे कुडाळ पोलीस ठाणे येथे दिल्यानंतर कुडाळ व माणगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरू आहे.कु. विरालीचा मृतदेह शवविश्चेदनाकरिता माणगांव प्रातमिक आरोग्य केंद्रात सांयकाळी आणला. या घटनेमुळे रेमुळकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.







