ठळक घडामोडी

आगामी जि.प. व पं.स. निवडणुकीत ठाकरे शिवसेनेचा झेंडा फडकविण्यासाठी सज्ज होण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन

ठाकरे शिवसेनेची कुडाळ येथे जिल्हा कार्यकारिणी बैठक

शिवसेनेचे नेते – खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते – आमदार भास्कर जाधव यांची उपस्थिती

कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकरांसह जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

कुडाळ : प्रतिनिधी
      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकत्याच झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांसह कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा कुडाळ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. यावेळी आगामी जि.प. व पं.स. निवडणुकीत ठाकरे शिवसेनेचा झेंडा फडकविण्यासाठी आतापासूनच सज्ज व्हा असे आवाहन, उपस्थित शिवसेना नेत्यांनी कार्यकर्त्यांना केले.
        जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन मंगळवारी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे करण्यात आले होते. यावेळी ठाकरे शिवसेनेचे नेते – खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते – आमदार भास्कर जाधव, उपनेते – जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, गौरीशंकर खोत, माजी आमदार वैभव नाईक व परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, उपनेत्या जान्हवी सावंत, महिला आघाडी जिल्हा संघटक श्रेया परब व निलम सावंत, नितीन वाळके, युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक सुशांत नाईक व मंदार शिरसाट, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक व कृष्णा धुरी, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, तालुका संघटक बबन बोभाटे, सचिन कदम यांच्यासह तालुकाप्रमुख, नवनिर्वाचित नगरसेवक, शाखाप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
     यावेळी यावेळी खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी आगामी जि.प. व पं.स. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला. तसेच या निवडणुकीत ठाकरे शिवसेनेचा झेंडा फडकविण्यासाठी आतापासूनच सज्ज व्हा असे आवाहन, त्यांनी केले. वैभव नाईक, परशुराम उपरकर, गौरीशंकर खोत, जान्हवी सावंत, सतीश सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांना संबंधीत केले.

error: Content is protected !!