मालवण : महेश कदम
मालवण कुंभारमाठ जरीमरी येथील नाजिया सनाऊला खान (वय 20) या युवतीने घराच्या मागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. तिच्या आत्महत्तेचे कारण समजू शकले नाही. याबाबत मालवण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे, अशी माहीती मालवण पोलिसांकडून देण्यात आली.
पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, नाजिया ही दोन महिन्यापासून आपल्या वडिलांना मी कुठेतरी कामाला जाते असे सांगायची मात्र तिच्या वडिलांनी ती लहान असेल्याने तिला कामाला जाण्यास नकार दिला होता. तेव्हापासून ती घरात गप्प असायची. शनिवारी रात्री नाजियाची आई घरात नमाज पठाण करत होती तर ती बाहेरच्या खुर्चीवर बसली होती. वडील आणि भाऊ वायरी येथे नमाज पठण करण्यास गेले होते. आईने नमाज पठण करून झाल्यावर नाजिया हिला शोधण्यास सुरुवात केली तेव्हा ती घरानजीकच्या आंब्याच्या झाडाला गळफास स्थितीत लटकताना आढळून आली. घरी तिचे वडील आल्यावर त्यांनी तात्काळ मालवण पोलिसांना याची माहिती दिली असता महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, गणेश माने, सुशांत पवार, जितेंद्र पेडणेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबतची खबर बहीण आफ्रिन सनाऊला चौधरी यांनी मालवण पोलीस स्थानकात दिली आहे. पुढील तपास मालवण पोलिस करीत आहेत अशी माहीती मालवण पोलिसांकडून देण्यात आली.







