ठळक घडामोडी

वेंगुर्लेत जि.प.–पं.स.साठी ९९ उमेदवारी अर्ज दाखल!

वेंगुर्ला : प्रतिनिधी
   वेंगुर्ला तालुक्यातील 5 जिल्हा परिषद मतदारसंघासाठी आज बुधवारी 21 जानेवारी रोजी पर्यंत एकूण 37 उमेदवारी अर्ज तर 10 पंचायत समिती मतदारसंघांसाठी एकूण 62 उमेदवारी अर्ज असे एकूण 99 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार ओतारी यांनी दिली. यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी हेमंत किरुळकर उपस्थित होते.
    यामध्ये पंचायत समितीनिहाय दाखल अर्ज : म्हापण 11, परुळे 9, आडेली 10, वायंगणी 7, तुळस 4, मातोंड 8, उभादांडा 2, आसोली 4,रेडी 3 व शिरोडा 4 असे एकूण 62 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.तर जिल्हा परिषदनिहाय दाखल अर्ज : म्हापण 6, आडेली 13, तुळस 6, उभादांडा 3 व रेडी 9 असे एकूण 37 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
      यावेळी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी व उपनिरीक्षक योगेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात होता. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार राजन गवस व गटविकास अधिकारी दिनेश पाटकर व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या योग्य नियोजनात निवडणूक अर्ज दाखल प्रक्रिया सुरळीत पार पडली. उद्या गुरुवारी सकाळी 11 वा. पासून छाननी प्रक्रिया होणार आहे.

error: Content is protected !!