कुडाळ : प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर कुडाळ पंचायत समिती प्रशासनाची धावपळ वाढली आहे. प्रशासकीय कालावधीत बंद असलेली सभापती व उपसभापती यांची दालने साडे तीन वर्षांनी उघडण्यात आली असून तेथे साफसफाई, रंगरंगोटी व किरकोळ दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
शुक्रवारपासून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने निवडणुकीनंतर वाढणारी लोकप्रतिनिधी व नागरिकांची वर्दळ लक्षात घेऊन प्रशासनाकडून पं.स. मधील सभापती – उपसभापती यांची दालने सज्जतेसाठी प्रशासनाकडून जोरात कार्यवाही सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पंचायत समितीच्या कामकाजाला पुन्हा गती येणार असून शांत असलेली ही दालने पुन्हा एकदा राजकीय आणि प्रशासकीय हालचालींनी गजबजणार आहेत.









