नालासोपारा व भगवानगडसाठी बस सेवा उपलब्ध
देवगड : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या देवगड आगारातून देवगड नालासोपारा आणि देवगड भगवान गड या प्रवासी फेऱ्या उन्हाळी हंगामात सुरु करण्यात येत आहेत. देवगड नालासोपारा ही प्रवासी फेरी दि. ११ एप्रिल रोजी सुरु करण्यात येत असून दु ३ वा. देवगड हुन सुटणार आहे तरेळे चिपळूण पनवेल सायन मार्गे बोरिवली नालासोपारा परतीच्या प्रवासासाठी वरील मार्गे दु ३ वा. निघणार आहे.
याबरोबरच देवगड भगवानगड ही पहाटे ५ वा. सुटणारी प्रवासी फेरी दि १४ एप्रिल पासून सुरु करण्यात येत आहे. ही प्रवासी फेरी गगनबावडा कोल्हापूर सातारा बारामती कर्जत, कडा, पाथर्डी मार्गे भगवानगड अशी जाईल व परतीच्या प्रवासासाठी भगवान गड येथून स. ६ वा.भगवानगड वरील मार्गे निघणार आहे. या प्रवासी फेऱ्यांचे आगाऊ आरक्षण ऑफलाईन व ऑनलाईन सुरु करण्यात आले आहे तरी या प्रवासी फेरीचा प्रवासी वर्गाने लाभ घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक निलेश लाड स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर सहा.वहा. निरीक्षक सचिन डोंगरे यांनी केले आहे.








