ठळक घडामोडी

पिंगुळी जि. प. मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचा प्रचार सुरू!

साळगाव पं.स.सह पिंगुळी जि.प.त मतदारांच्या गाठीभेटींना चांगला प्रतिसाद

गंगाराम सडवेलकर व कृष्णा धुरी यांचा गावागावात नियोजनबद्ध संपर्क

कुडाळ : प्रतिनिधी
       पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार गंगाराम सडवेलकर तसेच साळगाव पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार कृष्णा धुरी यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. दोन्ही उमेदवारांनी मतदारांच्या थेट गाठीभेटींवर भर देत प्रचाराची दिशा ठरवली आहे.
      मतदारसंघात नियोजनबद्ध प्रचाराची रणनीती आखून गावागावात जाऊन मतदारांशी संवाद साधण्यात येत आहे. स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि भविष्यातील धोरणे याबाबत मतदारांशी थेट चर्चा केली जात असून, प्रचाराला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. मतदारांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रचाराला चांगली दिशा मिळत असल्याचे गंगाराम सडवेलकर व कृष्णा धुरी यांनी सांगितले.

error: Content is protected !!