ठळक घडामोडी

करुळ येथे १० वनराई व कच्च्या बंधाऱ्यांची उभारणी!

वैभववाडी : प्रतिनिधी
    पाणी आडवा–पाणी जिरवा योजनेअंतर्गत करुळ ग्रामपंचायतीच्या वतीने गावात १० वनराई व कच्च्या बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. या बंधाऱ्यांची पाहणी वैभववाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रीमेश वाघ यांनी करून समाधान व्यक्त केले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जामदारवाडी येथील बंधाऱ्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
      मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत करुळ, के.सी. महाविद्यालय मुंबई, माध्यमिक विद्यालय करुळ आणि ग्रामसेवक संघटना वैभववाडी यांच्या सहकार्यातून ही कामे पूर्ण झाली आहेत. या बंधाऱ्यांमुळे गावातील विहिरी व बोअरवेलची पाण्याची पातळी वाढली असून शेती व पाळीव जनावरांसाठी पाण्याचा चांगला उपयोग होत आहे.
     यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, सरपंच नरेंद्र कोलते, विस्तार अधिकारी प्रकाश आडुळकर, उपसरपंच भास्कर सावंत, मुख्याध्यापक दीपक घाटगे, शिक्षक विलास गुरव, ग्रामसेवक शशिकांत गुरव यांच्यासह संजय कदम, शिवाजी पवार, राजेंद्र पवार, दत्ताराम पाटील तसेच ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!