कार्याध्यक्षपदी निलेश तेंडुलकर, अध्यक्षपदी भास्कर केरवडेकर तर सचिवपदी अॅड.मिलिंद बांदिवडेकर यांची निवड
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुका देवळी हितवर्धक संघाची नवी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून भास्कर केरवडेकर, कार्याध्यक्ष म्हणून निलेश तेंडुलकर तर सचिव म्हणून ॲड. मिलिंद बांदिवडेकर यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी प्रसाद साळगावकर, विनायक पिंगुळकर, नागेश ओरसकर व संजय नाईक यांची जबाबदारी देण्यात आली आहे. महिला संघटक म्हणून अर्चना घावनळकर तर युवा संघटक म्हणून सागर वालावलकर काम पाहणार आहेत.
संघाच्या खजिनदारपदी प्रदीप कुडाळकर यांची निवड करण्यात आली असून सहसचिव म्हणून अरविंद तेंडोलकर व सुहास पाटकर काम पाहणार आहेत. सल्लागार म्हणून ॲड. विवेक मांडकुलकर, ॲड. सुशांत पिंगुळकर, ॲड. अनघा तेंडुलकर, ॲड. विनय मांडकुलकर व सुहास बांबर्डेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघाच्या कार्यकारिणीत आजी-माजी लोकप्रतिनिधी, वकील, डॉक्टर, पत्रकार, लेखा परीक्षक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश करण्यात आला आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून शिवराम पणदूरकर, निलेश ओरसकर, प्रशांत पोईपकर, अरुण अणावकर, राजेश हेदळकर, परशुराम तुळसुळकर, मकरंद साळगावकर, अमोल साळगावकर, सौरभ पाटकर, वैभव चेंदवणकर, धोंडी नाईक, नामदेव जांभवडेकर, मामा कसालकर, सुहास बांबुळकर, सदानंद देवळी, कृष्णा बिबवणेकर, समीर मटकर, गोपाळ कवठणकर, दिलीप पडवेकर, विराज बावकर, दिनेश साळगावकर, डॉ. पी. डी. वराडकर, सगुण बांबर्डेकर, दिनकर तळवणेकर, प्रशांत केरवडेकर, सुहास वसंत बांबुळकर आदींचा समावेश आहे.
कायम निमंत्रित व मार्गदर्शक म्हणून सावळाराम अणावकर, घनश्याम वालावलकर, चंद्रकांत अणावकर, प्रकाश सावंत, दिनेश आजगावकर, मंदार परुळेकर, विकास कुडाळकर, प्रकाश नेरुरकर, दिगंबर गोवेरकर, बाळ कनयाळकर, महेश कुडाळकर, उदय कुडाळकर, वर्षा कुडाळकर व डॉ. अनिल साळगावकर हे संघाला मार्गदर्शन करणार आहेत. या संघाला जिल्हा संघाचे अध्यक्ष राजन नाईक व ज्येष्ठ शिक्षक नेते सावळाराम अणावकर यांचे मार्गदर्शन कायम लाभणार आहे.
यावेळी संघाच्या भावी वाटचालीबाबत चर्चा करताना समाजातील सर्व घटकांना अडीअडचणीच्या काळात मदत करणे, देवस्थानिक कामकाजात अन्याय होत असल्यास त्याबाबत योग्य विचार-विनिमय करून भूमिका मांडणे तसेच वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक व उपक्रमात्मक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या कार्यकारिणीमुळे कुडाळ तालुक्यातील देवळी समाजाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.









