ठळक घडामोडी

भंडारी भवनासाठी दिलेला शब्द पालकमंत्री नितेश राणे यांनी पाळला – अतुल बंगे

कुडाळ येथील भंडारी भवनासाठी भूखंड प्रस्तावावर तातडीची कार्यवाही

जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांचे आदेश, भंडारी समाजाला दिलासा

कुडाळ : प्रतिनिधी
    सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाजाने कुडाळ येथील भंडारी भवनासाठी मागणी केलेल्या भुखंडाची तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना दिले आहेत. त्यामुळे पालकमंत्री ना. राणे यांनी भंडारी समाजाला दिलेला शब्द पाळला असल्याची प्रतिक्रिया कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळ अध्यक्ष अतुल बंगे व जिल्हा भंडारी समाजाचे राजु गवंडे यांनी आज प्रसिद्धी पत्रकातून दिली.
     कुडाळ येथे जिल्हा भंडारी समाज भवन व्हावे व त्यासाठी शासकीय भुखंड मिळावा अशी मागणी जिल्हा भंडारी समाज महासंघाने जिल्ह्याचे पालकमंत्री ना.नितेश राणे यांच्याकडे केली होती. या अनुषंगाने पालकमंत्री ना. राणे यांनी आपण शब्द देत भंडारी भवन उभारले जाईल आणि भुखंडही उपलब्ध करून दिला जाईल असा शब्द दिला होता. या शब्दाला जागून पालकमंत्री ना. राणे यांनी जिल्हाधिकारी धोडमिसे यांना आदेश देऊन तातडीने प्रस्ताव मागावुन घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांनी प्रस्ताव परीपुर्ण करुन उपविभागीथ अधिकारी (कुडाळ) ऐश्वर्या काळुशे यांच्या मार्फत तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यामुळे भंडारी समाजाला दिलेला शब्द पालकमंत्री ना. राणे यांनी पाळला असल्याची प्रतिक्रिया कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळ अध्यक्ष तथा जिल्हा भंडारी समाजाचे जिल्हा माजी अध्यक्ष अतुल बंगे व जिल्हा भंडारी समाजाचे राजु गवंडे यांनी दिली.

error: Content is protected !!