श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मूळ चर्मपादुकांचे होणार आगमन
नवव्या वर्धापनदिनानिमित्त महालक्ष्मी श्री सुक्त याग व विविध धार्मिक कार्यक्रम

कुडाळ : प्रतिनिधी
श्री क्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ समाधी मठ (मूळ स्थान) येथील श्री स्वामी समर्थ महाराजांनी वापरलेल्या मूळ चर्मपादुकांचे कुडाळ तालुक्यातील कासमळा-घावनळे येथील श्री स्वामी समर्थ मठात शुक्रवार दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ मिरवणूकीने आगमन होणार आहे. तसेच श्री स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती प्रतिष्ठापना ९ व्या वर्धापनदिनानिमित्त २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत महालक्ष्मी श्री सुक्त याग व विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री वेदमूर्ती नितीन पुजारी (चोळप्पा महाराज यांचे ५ वे वंशज), ब्रह्मवृंद व श्री गुरुवर्य दादा व माऊली यांच्या मार्गदर्शनाने ओम श्री सद्गुरू स्वामी समर्थ जगदमाता परीवार श्री स्वामी समर्थ मठ घावनळे-कासमळा यांच्या वतीने या भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सव कालावधीत दररोज दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत व रात्री ८ ते १० वाजेपर्यंत महाप्रसाद तसेच सायंकाळी ४ ते ६ या वेळेत कीर्तन, भजन व नामस्मरण व सायं.७ वाजता आरती असे कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवार दि. २० फेब्रुवारी रोजी दुपारी २ वा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ चर्मपादुकांचे आगमन होणार असून त्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्याच दिवशी रात्री ८ वा. श्री सातेरी देवी महिला दशावतार नाट्य मंडळ, पावशी यांचा ‘भक्तांची पाठीराखी आदिमाया’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. शनिवार दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वा. महालक्ष्मी श्री सुक्त यागानिमित्त महासंकल्प, गणेश पूजन, पुण्याःवाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, होम देवता स्थापना, श्री स्वामी समर्थ मूळ चर्मपादुका पूजन, अग्नि स्थापना, महानैवेद्य व आरती होणार आहे. रात्री ८ वा. डबलबारी कार्यक्रमासह विविध भजन-कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे. बुवा संतोष शितकर (दिवा ठाणे) विरूद्ध सुशील गोठणकर (भांडुप मुंबई) यांच्यात हा डबलबारी भजन सामना होणार आहे. रविवार दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वा. होम देवता पूजन, श्री स्वामी समर्थ मूळ चर्मपादुका पूजन, नवग्रह हवन, गणेश हवन, महालक्ष्मी हवन, महानैवेद्य व आरती होईल. सायंकाळी ७ वा. हरीपाठ आणि रात्री ८ वा. अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ, म्हापण यांचा ‘लेक माझी तुळजाभवानी’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. सोमवार दि. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला वर्धापन दिनानिमित्त महास्तकाभिषेक, महालक्ष्मी हवन, स्वामी गायत्री हवन, महानैवेद्य व आरती होईल. सायंकाळी ६ वा. तबला सोलो (तबला मयंक बेडेकर), ७ वा. पालखी सेवा आणि रात्री ९ वा. भाई कलिंगण प्रस्तुत श्री देव कलेश्वर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ नेरूरचे ‘जोगुलांबा अर्थात काल सर्प भैरवी’ हा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. मंगळवार दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वा. श्री स्वामी समर्थ मूळ चर्मपादुका पूजन, होम देवता पूजन, ९ वा. प्रायश्चित हवन, बलिपूजन, पूर्णाहुती, महानैवेद्य व आरती होईल. रात्री ८ वा. दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ, सिंधुदुर्ग यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. बुधवार दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ चर्मपादुकांचा सामुहिक भक्तगणांकडून अभिषेक, ९ वा. गंगा पूजन व कुंभमेळा होईल. रात्री ८ वा. श्री सावरेश्वर दशावतार नाटयमंडळ (आवेरा, वेंगुर्ला) यांचा श्री क्षेत्र गाणगापूर हा नाट्यप्रयोग होणार आहे. गुरुवार दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. कार्यक्रमाची सांगता, श्री सत्यनारायणाची महापूजा, महानैवेद्य व आरती होणार आहे. सायं. ६ वा. पालखी सेवा, रात्री ७ वा. गोपाळ काला, ८ वा. जय हनुमान पारंपारिक दशावतार नाटयमंडळ (आरोस, दांडेली) यांचा दख्खनचा राजा जोतिबा माझा हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सद्गुरू स्वामी समर्थ जगद्माता परिवार, कासमळा-घावनळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.









