ठळक घडामोडी

पणदूर तिठा येथील हार्डवेअर दुकानाच्या गोडावूनला मध्यरात्री आग!

मोठे आर्थिक नुकसान;  कुडाळ पोलिस घटनास्थळी दाखल

कुडाळ : प्रतिनिधी
      पणदूर तिठा येथील एका हार्डवेअर दुकानाच्या गोडावूनला मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. सदर हार्डवेअर दुकान हे रत्नदीपक सावंत यांच्या मालकीचे असून या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आगीत गोडावूनमधील प्लास्टिक टाक्या, पाईप्स तसेच अन्य हार्डवेअर साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. याच गोडावून शेडपासून काही अंतरावर उभ्या असलेल्या डीआय वाहनाचेही या आगीत मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक पाहणीत सदर आग अज्ञात व्यक्तीने लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास केला जात आहे.

error: Content is protected !!