कणकवली : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद व पंचायतीचे निकाल लागले आहेत. भाजपचे सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदी श्रद्धाराजे भोसले, वेंगुर्लेच्या नगराध्यपदी राजन गिरप निवडून आले आहेत. भाजपाला मतदारांनी चांगली साथ दिली आहे. मालवण नगराध्यक्षपदी ममता वराडकर, कणकवलीच्या नगराध्यक्षपदी संदेश पारकर निवडून आले आहेत. पालकमंत्री म्हणून सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचे अभिनंदन करतो. शहर विकासासाठी कुठलाही पक्षपाती न करता १०० टक्के न्याय देण्याची हमी देतो. आ. निलेश राणे यांचे अभिनंदन करतो, त्यांच्या नेतृत्वात मालवण , कणकवली जिंकली आहे. शहरविकास आघाडीच्या नेत्यांनी व संदेश पारकर यांनी केलेल्या भावनिक आवाहनाला कणकवलीकरांनीसाथ दिली आहे. कणकवली शहरातील जनतेने दिलेला कौल मान्य असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.
कणकवली येथील ओमगणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री राणे म्हणाले, भाजपचे कार्यकर्ते मालवण आणि कणकवली या दोन शहरामध्ये अतिशय प्रामाणिक लढले. लोकशाहीमध्ये लोकमताचा आदर ठेवायचा असतो. कणकवली आणि मालवणमध्ये संघटनात्मक लढण्यासाठी निश्चित पावले उचलू. आ. निलेश राणे यांचे अभिनंदन करतो. कणकवलीत शहर विकास आघाडीचे आणि मालवणमध्ये या निवडणुकीचे नेतृत्व निलेश राणे यांनी केले. शहराच्या विकासासाठी जे जे शब्द दिले, त्याबद्दल मी सहकार्य करण्यासाठी तयार असेन. कारण जनतेने त्यांच्या शब्दावर विश्वास टाकून निकाल दिला आहे, असे मंत्री राणे यांनी सांगितले आहे.
विकासकामांसाठी असलेला निधी हा जनतेचा असतो, राजकारणापलिकडे जाऊन काम करायचे आहे. विकास हाच केंद्रबिंदू मानून सरकारच्या माध्यमातून चारही ठिकाणी दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी काम करणार आहे. भाजप म्हणून अतिशय चांगली लढत आमच्या कार्यकर्त्यांनी दिली. माझ्या कार्यकर्त्यांनी अतिशय जोमाने काम केले आहे. सावंतवाडी, वेंगुर्लेत दोन्ही नगराध्यक्ष चांगल्या फरकाने निवडून आले आहेत. कणकवलीत समीर नलावडे आणि मालवणमध्ये शिल्पा खोत त्याचे अभिनंदन करतो. कारण त्यांनीही या निवडणुकीत चांगली लढत दिलेली आहे. कणकवलीतील जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. शहरविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्या विरुध्द एकत्र येत केलेली आघाडी आहे. कणकवलीत जनतेच्या भावना ज्या-ज्या गोष्टी होत्या त्या निकालातून दिसल्या आहेत.आमच्या विरोधात सगळे पक्ष आले होते. सर्वजण एकत्र येत आघाडी केली, सर्वजण माझ्याा विरोधात होते. मला नेतृत्वाला विचारावे लागेल की ,समीर नलावडे त्यांना पराभूत करण्यासाठी आमचे सगळे लोक विरोधात गेले होते. आम्ही बोलून चर्चा करू. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासमवेत असलेले सर्वजण कणकवीत विरोधात गेले. हे राणेंना सोबत काम करणारी लोक आहेत. मात्र, मी एवढाच शब्द दिलेला होत. या निवडणुकीत वातावरण खराब करायला देणार नाही. तो शब्द मी पाळला असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.
कणकवलीत हा जनतेने निकाल दिला आहे. या निवडणुकीच्या प्रचारात सर्व पक्षाने बाजू मांडली आहे. शहरविकास आघाडीच्या नेत्यांनी मांडलेले मुद्दे जनतेने स्वीकारले. संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली विकास कसा होतो ते पाहणार आहे. मतदार विकले जातात हे असे एकाही पण कोणी आरोप करणे हे मुळात चुकीचे आहे. निवडणुकांमध्ये प्रत्येक जण आपल्या प्रत्येक बाजूने लढत असतो. आपल्या पद्धतीने त्याच्यामध्ये कोण कमी जास्त अगर होत असेल तर शेवटी जनतेचा निर्णय अंतिम असतो. काहीठिकाणी नगरसेवकाला मतदान मिळते पण नगराध्यक्षाला मतदान मिळत नाही म्हणजे जनता सुज्ञ आहे. कणकवलीची जनता , मालवणची जनता , सावंतवाडी , वेंगुर्ले काय? कुठे पैसे वाटताना कुठे दिसले ? हे मला हे तरी तुम्ही मला व्हिडिओ दाखवा , असे आव्हान मंत्री राणे यांनी दिले आहे.
आ. निलेश राणेंच्या नेतृत्वाचा अभिमान- मंत्री नितेश राणे
कणकवलीत विकास झालेला आहे. तरीही जनतेने भाजपचा पराभव केला आहे. याबाबत आम्ही विश्लेषण करू, आम्ही पण जरा खोलात जाऊ. नेमके काय झाले? याची चर्चा होईल. विकास काम केल्यानंतर पण एवढीच आमची बाजू असताना पण जनतेने अगर वेगळ्या पद्धतीने विचार केला तर जनता जनता फार विचारपूर्वक मतदान करणारी आहे. कणकवलीत निलेश राणेंच्या एन्ट्रीमुळे शहर विकास आघाडीला ताकद मिळाली. त्याच्यामुळे हा विजय झाला आहे. माझा भाऊ म्हणून आ. निलेश राणेंवर मला अभिमान वाटत आहे, निश्चित मला समाधान आहे. शेवटी विजय रॅलीत निलेश राणेंचा फोटो घेऊन त्यांना जल्लोष करावा लागत आहे. यातच राणेंचे यश आहे. मतदारांनी ठरवून मतदान केलेले आहे. निलेश राणे यांचा विजय आहे. संदेश पारकर यांचे भावनिक आवाहन होते. त्यांना मतदारांनी साथ दिली. मी पण सावंतवाडी, वेंगुर्लेकडे जाणार आहे. निश्चितच विजेत्यांचे अभिनंदन करणार आहे. मालवणमध्ये चांगल्या फरकाने शिवसेनेचा नगराध्यक्ष बसला आहे.निश्चित कौतुक आहे. पालकमंत्री हा भाजपचा आहे. जे माझ्याकडे येणार आहेत, मी त्यांना न्याय देणार आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वांना मदत करणार आहे. कणकवलीत काही नगरसेवक वगळता महाविकास आघाडीचा जिल्ह्याच्या या चारही नगरपंचायतीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेल्याटी टीका मंत्री नितेश राणे यांनी केली.
फोटो
नितेश राणे
……………कणकवलीतील उन्मतपणा जनतेने गाडला – राजन तेली
कणकवली : कणकवलीकरांचा जाहीर अभिनंदन संदेश पारकर आणि त्यांच्या सगळ्या सहकाºयांचा मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर या सगळ्या नगरपालिकेचे निवडणूक मध्ये एकनाथ शिंदे ,मंत्री उदय सामंत या निवडणुकीत ज्यांनी महत्त्वाचा रोल बजावला ते आमचे आमदार निलेश राणे यांचे मनापासून धन्यवाद मानतो. कणकवलीच्या जनतेने जो विजय दाखवलेला आहे. तो विश्वास सार्थकी लावला जाईल. कणकवलीत जो काही उन्मतपणा चालला होता, तो भालचंद्र बाबांच्या भूमीत गाडून टाकल्याची प्रतिक्रिया माजी आ. राजन तेली यांनी दिली आहे.
आजच्या निकालाने कणकवली विकासाचे नवे पर्व निर्माण होणार आहे. कणकवलीकरांचे मी आभार मानतो. मालवण मध्ये सुद्धा आ. निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व त्यांच्या सहकाºयांनी जे काही जे काही मेहनत घेतली. बहुमताने मालवणचा नगराध्यक्ष जिंकले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व जिंकलेले सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे मी आभार मानतो.
फोटो – राजन तेली








