ठळक घडामोडी

मालवण पालिकेच्या विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड!

मालवण : प्रतिनिधी
       मालवण नगरपालिकेच्या विषय समिती सभापती निवड आज पार पडली. यात पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती सभापती पदसिद्ध अध्यक्ष म्हणून उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, सार्वजनिक बांधकाम सभापती पदी सहदेव बापर्डेकर, महिला बालकल्याण समिती सभापती पदी अन्वेशा आचरेकर, आरोग्य व स्वच्छता समिती सभापती पदी पूनम चव्हाण यांची बिनविरोध निवड मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी जाहीर केली. या निवडीनंतर पालिका परिसरात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला.
     जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार येथील पालिकेच्या विषय समिती सभापती पदाचा निवडणूक कार्यक्रम पालिकेत पार पडला. सकाळच्या सत्रात शिंदे शिवसेना, भाजप आणि ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने विविध समिती सदस्यांची नावे पीठासीन अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली तर दुपारी तीन वाजता सभापती पदासाठी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली.
यात पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती सभापती हे पदसिद्ध पद उपनगराध्यक्ष यांच्याकडे असल्याने दीपक पाटकर यांची निवड जाहीर करण्यात आली. यात सदस्य म्हणून शर्वरी पाटकर, मेघा सावंत, ललित चव्हाण, तपस्वी मयेकर यांची निवड करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदी सहदेव बापर्डेकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यात सदस्य म्हणून मेघा सावंत, महेश कोयंडे, मंदार केणी, मंदार ओरसकर यांची निवड करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता समिती सभापती पदी पूनम चव्हाण यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सदस्य म्हणून सिद्धार्थ जाधव, नीना मुंबरकर, दर्शना कासवकर, अनिता गिरकर यांची निवड जाहीर करण्यात आली. महिला बालकल्याण समिती सभापती पदी अन्वेशा आचरेकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यात उपसभापती म्हणून अश्विनी कांदळकर, सदस्य म्हणून भाग्यश्री मयेकर, महानंदा खानोलकर, अनिता गिरकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
    यावेळी पालिकेची स्थायी समितीही गठीत करण्यात आली आहे. यात अध्यक्ष ममता वराडकर, उपाध्यक्ष दीपक पाटकर, सदस्य सहदेव बापर्डेकर, पूनम चव्हाण, अन्वेशा आचरेकर यांचा समावेश आहे.
यावेळी महेश कांदळगावकर, सुदेश आचरेकर, पूनम चव्हाण यांनी आपले विचार मांडले. यावेळी विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने नवनिर्वाचित समिती सभापती यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

error: Content is protected !!