ठळक घडामोडी

कुडाळ येथे उद्या ड्रायव्हर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन!

सुरक्षित ड्रायव्हिंग – जबाबदार चालक या संकल्पनेवर भर
कुडाळ : प्रतिनिधी
     कुडाळ येथे लक्ष्मीनारायण पेट्रोलियम (इंडियन ऑईल डिलर) आणि शरद ऑटोमोबाईल (टाटा मोटर्स अधिकृत सर्व्हिस स्टेशन, कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रायव्हर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सुरक्षित ड्रायव्हिंग – जबाबदार चालक’ या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम शुक्रवार, दि. २ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत कुडाळ येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे.
     सद्यस्थितीत वाढती वाहनसंख्या आणि अपघातांचे प्रमाण लक्षात घेता सुरक्षित व जबाबदार वाहनचालक घडवणे ही काळाची गरज बनली आहे. याच अनुषंगाने वाहन चालवताना सुरक्षिततेचे नियम, इंधन बचत, वाहनाची योग्य देखभाल तसेच आधुनिक ड्रायव्हिंग कौशल्ये आत्मसात करण्याच्या उद्देशाने हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात अनुभवी व तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात येणार असून, व्यावसायिक तसेच खासगी वाहन चालकांसाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे. सुरक्षित ड्रायव्हिंगच्या सवयी, इंधनाचा योग्य वापर, वाहन देखभालीचे महत्त्व आणि आधुनिक ड्रायव्हिंग तंत्रज्ञानाबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. सर्व वाहन चालकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!