ठळक घडामोडी

कुडाळ महाविद्यालयात १२ जानेवारीपासून पर्मनंट सुरक्षा रक्षक भरतीचे आयोजन!

सुशिक्षित बेरोजगार युवकांनी लाभ घेण्याचे महाविद्यालयाचे आवाहन

कुडाळ : प्रतिनिधी
     संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे सूक्ष्म, लघु मंत्रालय भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत तसेच पसारा ॲक्ट २००५ नुसार पर्मनंट सुरक्षा रक्षक भरती आयोजित करण्यात आली आहे. ही भरती १२ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत महाविद्यालयाच्या परिसरात होणार आहे.
    ही भरती शिवस्वराज्य सेक्युरिटी अँड मॅन पॉवर सर्व्हिसेस प्रा. लि. व संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेल व DLLE विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. निवड झालेल्या उमेदवारांना पीएफ, मेडिकल, ग्रॅज्युइटी, पेन्शन व नियमानुसार भत्ते देण्यात येणार असून सुरुवातीस १६ ते २५ हजार रुपये पगार मिळणार आहे. महाराष्ट्रातच नोकरीची संधी देण्यात येणार आहे. या भरतीसाठी उमेदवार किमान १० वी उत्तीर्ण, वय १८ ते ४५ वर्ष, उंची १६८ सेमी, वजन ४८ किलोपेक्षा जास्त व वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी आधारकार्ड झेरॉक्स, शैक्षणिक प्रमाणपत्राची प्रत, दोन पासपोर्ट साइज फोटो सोबत आणावेत. निवड झालेल्या उमेदवारांसाठी ५०० रुपये नोंदणी शुल्क आकारले जाणार आहे.अधिक माहितीसाठी ९२८४१२५१०० / ८८८८६६९५९८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, प्लेसमेंट सेल प्रमुख डॉ. एस. एस. लोखंडे, DLLE प्रमुख डॉ. डी. जी. चव्हाण व भरती अधिकारी महेशकुमार सरतापे, गोरख जगताप यांनी केले आहे.

error: Content is protected !!