
खरेदी विक्री संघासमोरील मुख्य रस्त्यावर अपघात
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुका खरेदी विक्री संघासमोरील मुख्य रस्त्यावर आज सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास डंपर, कार आणि मोटारसायकल यांच्यात अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही; मात्र कारच्या मागील बाजूचे मोठे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, तीनही वाहने कॉलेज चौकातून पोस्ट ऑफिस चौकाच्या दिशेने येत होती. यावेळी हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात झालेली नव्हती.









