ठळक घडामोडी

कुडाळ येथे भगिनी मंडळ बालवाडीत शिवजयंती उत्साहात साजरी!

चिमुकल्यांची शिवकालीन वेशभूषा मिरवणूक ठरली लक्षवेधी

पोवाडा गायन व सांस्कृतिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ : प्रतिनिधी
      सावंतवाडी संस्थान मराठा समाज संचलित भगिनी मंडळ कुडाळच्या वतीने येथील बालवाडीत गुरूवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त बालवाडीतील विद्यार्थ्यांनी पोवाडा गायन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
    कार्यक्रमाच्या निमित्ताने बालवाडीच्या चिमुकल्यांनी शिवकालीन वेशभूषा साकारत काढलेली मिरवणूक विशेष लक्षवेधी ठरली. या मिरवणुकीत विद्यार्थी, पालक, स्थानिक समिती सदस्य तसेच भगिनी मंडळाच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी बालवाडीच्या शिक्षिकांनी विशेष मेहनत घेतली.

error: Content is protected !!