
२० ते २२ जानेवारी कालावधीत भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ – कविलकाटे येथील श्री सिद्धीगणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव गुरुवार दि. २२ जानेवारी २०२६ रोजी भक्तिभावात साजरा होत आहे. यंदा या उत्सवाचे २८ वे वर्ष असून, या निमित्ताने श्री सिद्धीगणपती देवस्थान कविलकाटेच्या वतीने तीन दिवसीय धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी, मंगळवार दि. २० जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत सद्गुरु श्री वामनराव पै जीवनविद्या मिशन (कविलकाटे शाखा) यांच्या वतीने नामस्मरण, हरिपाठ व प्रवचन होणार आहे. सायंकाळी ७ वाजता श्री सिद्धीगणपतीची आरती, रात्री ८ वाजता श्री सिद्धीगणपती प्रासादिक भजन मंडळ, कविलकाटे यांचे भजन (बुवा सिद्धार्थ पावसकर), रात्री ९ वाजता श्री रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ, बांबुळी (बुवा सुशांत बांबुळकर) यांचे भजन होणार आहे. रात्री १० वाजता बाळकृष्ण गोरे पारंपारिक लोककला दशावतार नाट्यमंडळ, कवठी यांचा “प्रारब्ध” हा नाट्यप्रयोग सादर होणार असून, या कार्यक्रमाचे सौजन्य सौ. सुवर्णा बाळा पेडणेकर, कविलकाटे यांचे आहे.
बुधवार दि. २१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता आरती, सायं. ७ वाजता श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, कविलकाटे (मधलीवाडी) यांचे सुश्राव्य भजन (बुवा प्रभाकर उर्फ बाळ गडेकर) होणार आहे. रात्री ८ वाजता स्थानिक मुलांचे रेकॉर्ड डान्स कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार दि. २२ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५ वाजता श्री व सौ. सुवर्णा बाळा पेडणेकर उभयतांकडून श्रींची पाद्यपूजा होणार आहे. सकाळी ६ ते ९ या वेळेत जीवनविद्या मिशनतर्फे गणेश नामस्मरण, सकाळी १० वाजता ह.भ.प. श्री लक्ष्मण नेवाळकर बुवा यांचे गणेश जन्मावर आधारित किर्तन होईल. दुपारी १२ वाजता गणेश जन्म सोहळा, महाआरती, सामुदायिक प्रार्थना व गाऱ्हाणे, दुपारी १ वाजता महाप्रसाद होणार आहे. दुपारी २ वाजता स्थानिक भजने, दुपारी ३ वाजता महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम, सायं. ३.३० वाजता श्री देवी चामुंडेश्वरी महिला फुगडी मंडळ, सायं. ४.३० वाजता श्री देव सिद्धीगणपती महिला फुगडी मंडळ यांची फुगडी सादर होणार आहे. सायं. ५.३० वाजता महाआरती होईल. सायं. ६ वाजता खानोलकर दशावतार नाट्यमंडळ, खानोली यांचा “चैत्र पौर्णिमा” हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. रात्री १० वाजता गोव्यातील सुप्रसिद्ध श्री साई दामोदर घुमट आरती मंडळ, मडगाव (गोवा) यांचा घुमट आरती व गायन कार्यक्रम होणार असून, गायक शुभम नाईक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे सौजन्य आशिष गुरुनाथ जळवी व स्वप्निल प्रभाकर जळवी यांचे आहे.माघी गणेश जयंतीनिमित्त आयोजित या तीन दिवसीय धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सिद्धीगणपती मंदिर देवस्थान, कविलकाटे यांच्या वतीने करण्यात आले आहे.








