ठळक घडामोडी

अनधिकृत वाळू वाहतूक करणारे गोव्यातील ६ डंपर पकडले!

ग्रामस्थांच्या मदतीने मालवण तहसीलदार व पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून कारवाई

मालवण : प्रतिनिधी
    मालवण शहरातील सागरी महामार्ग येथे हॉटेल आराध्य नजिक शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास मालवण तहसिलदार व पोलिस निरीक्षक यांनी नेमलेल्‍या संयुक्‍त पथकाने स्‍थानिक ग्रामस्‍थांच्‍या मदतीने अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या गोवा पासिंगच्या सहा डंपरवर धडक कारवाई करण्यात आली आहे.
     मालवण शहराला लागून असलेल्‍या सागरी महामार्गावर हॉटेल आराध्‍य नजीक २६ डिसेंबर रोजी रात्री १२.०० ते १२.१५ वाजण्याच्या दरम्‍यान ६ डंपरमधून अनधिकृत गौणखनिज (वाळू) ची बेकायदेशीर वाहतूक करण्‍यात येत असल्‍याची माहिती स्‍थानिक ग्रामस्‍थांना म‍िळताच सदरचे अनधिकृत वाळू वाहतूक करणारे डंपर मंदार केणी, वैभव मयेकर, मंगेश गोवेकर व इतर स्‍थानिक ग्रामस्‍थांनी अडविले व सदरची बाब तात्काळ मालवण पोलीस ठाण्यास कळवण्यात आली. या माहितीच्‍या आधारे पोलीस निरीक्षक मालवण यांचे पथकामार्फत डंपरची तपासणी केली असता वाहनामध्‍ये वाळु आढळून आली. सध्‍या वाळु वाहतुक करण्‍याची कोणत्‍याही प्रकारची अधिकृत परवानगी दिलेली नाही. अनधिकृतपणे वाळुची चोरी करण्‍याचे हेतुने वाहतुक करीत असल्‍याचे आढळुन आले. सदरच्‍या वाहनात वाळू असल्‍याने त्‍याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक यांनी तहसिलदारांना दिली. त्‍यानंतर तहसिलदार यांच्‍या सूचनांनुसार घटनास्‍थळी महसूल पथक उपस्थित झाले. त्‍यानंतर सदरहू डंपर पोलिस निरीक्षक मालवण यांचे ताब्‍यात देण्‍यात आलेले असून पुढील कारवाईसाठी तहसिलदार कार्यालय मालवण यांच्‍या आवारात लावण्‍यात आले आहेत.

error: Content is protected !!