ठळक घडामोडी

पणदूरतिठा येथील बॉक्सेलमधील बंद लाईट्स अखेर सुरू; नागरिकांना दिलासा

आमच्या पाठपुराव्याला यश – निखिल कांदळगावकर

कुडाळ : प्रतिनिधी
       मुंबई गोवा महामार्गावरील पणदूरतिठा येथील बॉक्सेल मधील विद्युत दिवे गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.
     या समस्येची गंभीर दखल घेत शिंदे शिवसेनेचे जिल्हा सरचिटणीस दादा साईल आणि निखिल कांदळगावकर यांनी संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधले होते. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर आज प्रशासनाकडून बॉक्सेल परिसरातील बंद असलेले सर्व विद्युत दिवे सुरू करण्यात आले. याबाबत माहिती देताना निखिल कांदळगावकर यांनी सांगितले की, गेले काही दिवस हे दिवे बंद होते. याबाबत संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. याची दखल घेत प्रशासनाकडून दिले सुरू करण्यात आले असून आमच्या पाठपुराव्याला यश आले आहे. दरम्यान, लाईट्स सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनासह पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

error: Content is protected !!