ठळक घडामोडी

एकाच बॅलेट युनिटवर दोन मते नोंदवावी लागणार!

जि.प.साठी एक मत आणि पं.स.साठी एक मत

कुडाळ निवडणूक निर्णय अधिका-यांची माहीती

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक–२०२६ करीता शनिवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी कुडाळ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एकच बॅलेट युनिट (Ballot Unit) वापरण्यात येणार आहे. मतदारांनी या एकाच बॅलेट युनिटवर दोन मते नोंदवायची आहेत. या करिता जिल्हा परिषद मतपत्रिका ही पांढऱ्या रंगाची तर पंचायत समितीची मतपत्रिका ही गुलाबी रंगाची राहील. तर एक मत जिल्हा परिषदसाठी व एक मत पंचायत समिती साठी नोंदवल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही. मतदारांनी मतदान करताना बॅलेट युनिटवरील चिन्हे व पर्याय काळजीपूर्वक पाहून आपले जिल्हा परिषदेकरिता एक व पंचायत समिती साठी एक असे मतदान करावे. तसेच कोणताही गोंधळ टाळण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे व तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.

error: Content is protected !!