कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहरातील जागृत देवस्थान श्री देव गवळदेव पंचायतनाचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दि. 25 डिसेंबर 2025 रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. सकाळी अभिषेक, श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी हरिपाठ, सांज आरती, भजन, रात्री 10 वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा व रात्री 12 वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळ वालावल यांचे दशावतारी नाटक आदी कार्यक्रम होणार आहेत.









