ठळक घडामोडी

कुडाळ-मालवण तालुक्यात ५ नव्या आरोग्य उपकेंद्रांसाठी २.८० कोटींचा निधी मंजूर!

आ.निलेश राणे यांनी मानले आरोग्य मंत्र्यांचे आभार

कुडाळ तालुक्यात वाडोस, गोठोस, जांभवडे आणि घोटगे तर मालवण तालुक्यात तारकर्लीत होणार उपकेंद्रे

कुडाळ : प्रतिनिधी
    १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत कुडाळ–मालवण तालुक्यातील ५ नवीन आरोग्य उपकेंद्रांच्या बांधकामासाठी तब्बल २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आमदार निलेश राणे यांनी आभार मानले आहेत. या निधीमुळे कुडाळ–मालवण तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व प्रभावी बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
     मालवण तालुक्यातील तारकर्ली येथे नवीन आरोग्य उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. तर कुडाळ तालुक्यातील वाडोस, गोठोस, जांभवडे आणि घोटगे या गावांमध्ये आरोग्य उपकेंद्रांच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे. या उपकेंद्रांमुळे स्थानिक नागरिकांना प्राथमिक उपचार, तसेच आपत्कालीन आरोग्य सुविधा जवळच्या परिसरातच उपलब्ध होणार आहेत. या नवीन आरोग्य उपकेंद्रांमुळे विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. हा महत्त्वपूर्ण निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आमदार निलेश राणे यांनी आभार मानले आहेत. याबाबतची माहीती आमदार श्री.राणे यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली.

error: Content is protected !!