ठळक घडामोडी

डिगस मधील श्री काळंबा देवी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन!

नवीन खांब-काठीसह नवीन मोव्हरी (मुखवटे) यांचा पुनःप्रतिष्ठापना सोहळा; भक्तीमय वातावरणात मिरवणूक

रविवार (दि. १२ एप्रिल) पर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

कुडाळ : प्रतिनिधी
       डिगस (ता.कुडाळ) येथील ग्रामदैवत श्री काळंबा देवी मंदिरात नवीन खांब-काठीसह नवीन मोव्हरी (मुखवटे) यांच्या पुनःप्रतिष्ठापना सोहळ्याला बुधवारपासून भक्तीमय वातावरणात उत्साहात सुरुवात झाली आहे. या निमित्ताने ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
     या मिरवणुकीची सुरुवात पणदूर – डिगस सीमेवरून करण्यात आली. तेथून श्री देव लिंगेश्वर मंदिर येथे मिरवणूक पोहोचली व त्यानंतर ती श्री काळंबा देवी मंदिरात दाखल झाली. या मिरवणुकीत डिगस ग्रामस्थ, महिला व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या धार्मिक सोहळ्यानिमित्त रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ पर्यंत विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
       *कार्यक्रमाचे ठळक आयोजन*
शुक्रवार, १० एप्रिल : सायं. ७ वा. श्री काळंबा देवीच्या नवीन रंगमंचाचे उद्घाटन व देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘व्यंकट रमण जय गोविंदा’ (महिमा तिरुपती बालाजीचा) नाट्यप्रयोग.
शनिवार, ११ एप्रिल : सकाळी ८ वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रम, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं. ७.३० वा. हरिपाठ व स्थानिक भजने
रविवार, १२ एप्रिल : सकाळी ८ वाजल्यापासून धार्मिक विधी, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं. ४ वा. तरंगासहित पालखी प्रदक्षिणा, सायं. ७.३० वा. हरिपाठ व भजने, रात्री १० वा.श्री माऊली दशावतार नाट्य मंडळ, इन्सुली यांचा ‘धर्मविजय’ नाट्यप्रयोग.
तरी या सोहळ्याचा सर्वानी लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त गावकर, बारापाच व ग्रामस्थ मंडळी डिगस यांनी केले आहे.

error: Content is protected !!