ठळक घडामोडी

कुडाळ तालुक्यातील नवनिर्वाचित जि.प.-पं.स. सदस्यांचा सत्कार!

पंचायत समिती, सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचा पुढाकार

तालुक्याच्या सर्वागिण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची लोकप्रतिनिधींची ग्वाही

कुडाळ : प्रतिनिधी
       कुडाळ पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. तालुक्याच्या सर्वागिण विकासासाठी कटिबद्ध राहू, अशी ग्वाही यावेळी नवनिर्वाचित सदस्यांनी दिली.
      पंचायत समिती, सरपंच संघटना व ग्रामपंचायत अधिकारी संघटना यांच्या मार्फत पंचायत समितीच्या सभागृहात गुरूवारी सायंकाळी हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, सरपंच संघटना तालुकाध्यक्ष राजन परब, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, विस्तार अधिकारी संजय ओरोसकर, ग्रामपंचायत अधिकारी संघटना तालुकाध्यक्ष प्रदीप नारकर यांच्यासह तालुक्यातील सरपंच, पं.स.चे सर्व खातेप्रमुख अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
     यावेळी जि.प. सदस्य केशव उर्फ दीपक नारकर (घावनळे), रुपेश कानडे (माणगाव), तुकाराम उर्फ दादा साईल (पावशी), आरती पाटील (तेंडोली), गंगाराम सडवेलकर (पिंगुळी), रुपेश पावसकर (नेरूर), दीपलक्ष्मी पडते (आंब्रड), सुप्रिया वालावलकर (ओरोस), नागेश आईर (वेताळबांबर्डे) यांचा सत्कार करण्यात आला.
       तसेच पं.स. सदस्य नितीन महाडेश्वर (आंब्रड), ममता राऊळ (पिंगुळी), मिलिंद नाईक (साळगाव), संतोष कांदळकर (कसाल), निखिल कांदळगावकर (डिगस), योगेश धुरी (माणगाव), सिताराम तेली (झाराप), बाळकृष्ण मडव (जांभवडे), श्रावणी तेरसे (आवळेगाव), अश्विनी सावंत (वेताळबांबर्डे), अमित भोगले (ओरोस), करुणा पावसकर (पावशी), दीप्ती नाईक (नेरूर उत्तर),  अर्चना बंगे (नेरूर दक्षिण), मंगेश प्रभू (तेंडोली), अर्चना घावनळकर (घावनळे), प्रियांका दळवी (पाट), दिव्यानी खरात (गोठोस) यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रदिप नारकर यांनी केले. सुत्रसंचालन विस्तार अधिकारी संदेश परब यांनी केले.

error: Content is protected !!