ठळक घडामोडी

आंदुर्ले ग्रामपंचायतीकडून ‘पेशंट बॅंक’ची सुरुवात

ज्येष्ठ नागरिक व रुग्णांसाठी आंदुर्लेत दिलासा

समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आरोग्यदायी उपक्रम

कुडाळ : प्रतिनिधी
    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आंदुर्ले ग्रामपंचायतीने गावातील रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘पेशंट बॅंक’ सुरू केली आहे. या उपक्रमातून आजारी रुग्णांना आवश्यक वैद्यकीय साहित्य मागणीनुसार ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये हॉस्पिटल बेड, व्हील चेअर, वॉकर, कमोड चेअर आदी साहित्याचा समावेश असून, लोकसहभागातून आणखी साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
     यावेळी सरपंच श्री. अक्षय तेंडोलकर, उपसरपंच श्री. चंद्रकीसन मोर्ये, माजी सरपंच सौ. आरती पाटील, ग्रामसेवक श्री. कृष्णा पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. अनिल भगत, श्री. प्रसाद सर्वेकर, श्रीम. अंजनी पाटकर, सौ. स्मिता पिंगुळकर, सौ. सुप्रिया येरम, आरोग्य सेविका सौ. आर. एस. बागकर, सर्व अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!