ठळक घडामोडी

कुडाळ दत्तनगरात एमआरएफ कचरा डेपोला स्थानिकांचा तीव्र विरोध!

सिंधुदुर्गनगरीत लाक्षणिक उपोषण छेडत वेधले प्रशासनाचे लक्ष

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ नगरपंचायत प्रशासनाकडून शहरातील दत्तनगर मधील सर्व्हे नंबर १६६/२/१२ घनकचरा साठवण डेपो (एमआरएफ सेंटर) प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र या जागेत हा प्रकल्प उभारण्यास परिसरातील स्थानिक रहिवाशी नागरिकांनी विरोध दर्शवला असून, याबाबत सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज लाक्षणिक उपोषण छेडत प्रशासनाचे लक्ष वेधले. दत्तनगर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित कुडाळच्या वतीने प्रशासनाला निवेदनही देण्यात आले. या उपोषण प्रसंगी सोसायटी अध्यक्ष शरद वालावलकर, नगरसेविका सौ.श्रेया गावंडे, नगरसेवक गणेश भोगटे, नगरसेवक मंदार शिरसाट, विनायक रामदास, सुशील चिंदरकर, आनंद वालावलकर, राजू गवंडे, मनोज वालावलकर, विनायक पाटील, अल्तमश शहा, आदिल शहा, राहील शहा, अविनाश नायके, सुनील जाधव व नागरिक उपस्थित होते. दरम्यान भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई यांनी उपोषणाला भेट देत यशस्वी मध्यस्थी केली. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले.

error: Content is protected !!