ठळक घडामोडी

मुंबई-गोवा महामार्गाचा विलंब; खासदार सदानंद शेट तानावडे संसदेत आक्रमक!

नवी दिल्ली : प्रतिनिधी
          मुंबई-गोवा महामार्गाच्या (NH 66) रेंगाळलेल्या कामावरून राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी केंद्र सरकारला जाब विचारला आहे. संसदेच्या शून्य प्रहरात त्यांनी या महामार्गाचा प्रश्न लावून धरला.
      *उपस्थित केले महत्त्वाचे मुद्दे*
         १० वर्षांहून अधिक काळ लोटला तरी प्रकल्प अपूर्णच, रस्ता खराब असल्याने पर्यटन, व्यापार आणि कोकणच्या विकासावर गदा,पावसाळ्यापूर्वी उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करत काम पूर्ण करण्यासाठी सरकारने स्पष्ट कालमर्यादा निश्चित करावी अशी मागणी कली.आजवर अनेकदा आश्वासने मिळाली, पण आता कोकणवासीयांना ठोस कृती आणि पूर्ण झालेला रस्ता हवा आहे, अशी खा. तानावडे यांनी राज्यसभेत मागणी केली.

error: Content is protected !!