२ फायर ब्रिगेडच्या बंब घटनास्थळी पाचारण; आग विजविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू
नगराध्यक्षांसह नगरसेवक व प्रशासनाची घटनास्थळी धाव
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायतीच्या सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोला आज बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. भर दुपारच्या वेळेस लागलेली आग वा-याने भडकली. आगीने रौद्र रूप धारण करीत संपूर्ण कचरा डेपोला वेढा दिला. आगीची माहीती मिळताच नगरपंचायत प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. नगरपंचायत व एमआयडीसीचे अग्नीशमन बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून, आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नगरसेवक निलेश परब, नगरसेविका संध्या तेरसे, श्रेया गवंडे यांच्यासह लोकप्रतिनिधी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. कुडाळ शहरातील गोळा केलेला कचरा सांगिर्डेवाडी (महामार्गानजिक) पाण्याच्या टाकी नजिकच्या जागेत डंम्प केला जातो. या कच-याला आज दुपारी अचानक आग लागल्याने प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली.









