ठळक घडामोडी

सरकारची प्रतिमा सेवा केंद्र चालकांच्या हाती; मंत्री आशिष शेलार यांचे प्रतिपादन!

आमदार निलेश राणे यांच्याकडून शेलार यांच्या ‘सुपर फास्ट’ कार्यपद्धतीचे कौतुक

कुडाळ : प्रतिनिधी
           ग्रामीण भागातील जनतेला शासकीय सेवा देणाऱ्या केंद्र चालकांच्या प्रामाणिकपणावरच सरकारचे नाव अवलंबून असते. तुम्ही दिलेली दर्जेदार सेवा हीच शासनाची खरी ओळख आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ना. आशिष शेलार यांनी कुडाळ येथे केले.
       जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गच्या वतीने शनिवारी आयोजित आधार किट वाटप, ‘आपले सरकार’ सेवा केंद्र वाटप आणि शिवकालीन साहसी कला-खेळ कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कुडाळ येथील महालक्ष्मी हाॅलच्या सभागृहात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर आ.निलेश राणे, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कुडाळ सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सीताराम तेली, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, कुडाळ तहसीलदार सचिन पाटील, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावकर,नायाब तहसिलदार अमरसिह जाधव, संजय गवस,जि.प.सदस्य दीपक नारकर,रुपेश कानडे आदीसह जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक बसवराज चिकोडी,जिल्हा प्रकल्प प्रमुख मयुर आयरे, रूपेश कुणकावळेकर, शितल प्रभु, शंकर भगत, पुजा सामंत, संतोष कांबळी, शशांक नाईक, प्रतीक चिंदकर  उपस्थित होते.
         आ. राणे म्हणाले की,अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला दशावतार कलाकारांच्या ओळखपत्राचा प्रश्न ना.शेलार  यांनी केवळ ५ मिनिटांत जीआर काढून मार्गी लावला,अशा शब्दांत  त्यांच्या कामाचा गौरव केला.
यावेळी  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील आधार केंद्र चालकांना ‘आधार किट’ आणि ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गुरव यांनी तर आभार प्रदर्शन प्रफुल्ल वालावलकर यांनी मानले.

error: Content is protected !!