बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा निवडणूकीत सलग दुसऱ्यांदा सदस्यपदी निवड
कुडाळात वकील संघटनेकडून पेढे वाटप व फटाक्यांच्या आतषबाजीत आनंदोत्सव
कुडाळ : प्रतिनिधी
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा यांच्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे सदस्य अॅड. संग्राम देसाई यांनी सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने सदस्यपदाची निवडणूक जिंकत उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांच्या या विजयाचे कुडाळात शनिवारी सायंकाळी उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.
कुडाळ तालुका बार कौन्सिलच्या वतीने पेढे वाटप, फटाक्यांची आतषबाजी आणि जल्लोषी वातावरणात विजयोत्सव साजरा करण्यात आला. अॅड. संग्राम देसाई यांच्या विजयामुळे जिल्ह्यातील वकिलांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांच्या कार्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी बार कौन्सिलचे तालुकाध्यक्ष अॅड. गौरव पडते, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. विवेक मांडकुलकर, अॅड. राजीव बिले, अॅड. अमोल सामंत, अॅड. रूपेश देसाई, अॅड. सुधीर राऊळ, अॅड. आनंद गवंडे, अॅड. अविनाश परब, अॅड. निखिल गावडे, अॅड. सुशांत घाडीगावकर, अॅड. समीर कुळकर्णी, अॅड. विनय मांडकुलकर, अॅड. दत्ताराम बिले, अॅड. महेश शिंपूगडे, अॅड. सुयश गवंडे, अॅड. भाऊराव परब, अॅड. अक्षय चिंदरकर यांच्यासह तालुक्यातील अनेक वकील व सदस्य उपस्थित होते.









