ठळक घडामोडी

ओरोस परबवाडीतील श्री ब्राम्हणदेव मंदिरात रविवारी धार्मिक कार्यक्रम!

‘कृष्ण लीला’ नाट्यप्रयोगाचे आकर्षण; धार्मिक-सांस्कृतिक संगम

भजन, महापूजा ते दशावतार नाट्यप्रयोग; भाविकांसाठी विशेष कार्यक्रम

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
     वरची परबवाडी (ओरोस बु.) येथे श्री ब्राम्हणदेव भजन मंडळ आणि वरचीपारबवाडी मित्रमंडळाच्या वतीने रविवार, दि. १९ एप्रिल रोजी श्री ब्राह्मण देव मंदिरात श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. धार्मिक व सांस्कृतिक संगम असलेल्या या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
         सायंकाळी ४ वाजता महापूजेला सुरुवात होणार असून, सायं. ५.३० वाजता महाआरती व तीर्थप्रसाद वाटप होईल. त्यानंतर सायं. ६ वाजता स्थानिकांचे भजन सादर होणार आहे.रात्री ९.३० वाजता ओंकार पारंपरिक लीलाकला दशावतार नाट्यमंडळ, वेंगुर्ला यांचा ‘कृष्ण लीला’ हा देखणा दशावतारी नाट्यप्रयोग रंगणार असून, परिसरातील रसिकांसाठी ही खास आकर्षणाची पर्वणी ठरणार आहे.

error: Content is protected !!