
कुडाळ : प्रतिनिधी
माड्याचीवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात आज रविवारी केंद्रीय उर्जा मंत्री ना. श्रीपाद नाईक यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी मठाचे संस्थान प्रमुख श्री. गावडे काका महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन ना. श्रीपाद नाईक यांचा सत्कार करण्यात आला
ना. श्रीपाद नाईक यांनी माड्याचीवाडी येथील श्री स्वामी मठाचे प्रमुख गावडे काका महाराज यांच्या पार पडलेल्या वाढदिवसानिमित्त आज सदीच्छा भेट दीली आणि संस्थानच्या वतीने चाललेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती घेतली तसेच विशेष म्हणजे 86 कृष्ठरोगी यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले होते व पौष्टिक आहार देण्यात आला होता. या समाजोपयोगी कामाचे ना.नाईक यांनी कौतुक केले. यावेळी नेरुर देऊळवाडा पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्या बद्दल सौ.अर्चना अतुल बंगे यांचा सन्मान मठाचे श्री गावडे काका यांनी केला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, मठाचे अध्यक्ष एकनाथ गावडे, संचालक सुजय गावडे, पंकज कामत आदी उपस्थित होते.









