ठळक घडामोडी

मालवण बाजारपेठेतील सलून आगीच्या भक्ष्यस्थानी!

आग लागली की लावली याबाबत संभ्रम

मालवण : महेश कदम
      मालवण बाजारपेठेतील निलेश चव्हाण यांच्या दिलखुश सलून दुकानाला अचानक आग लागून संपूर्ण दुकान आगीच्या भक्षस्थानी पडले. यामुळे सुमारे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना सोमवारी रात्री उशिराच्या सुमारास घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी निलेश चव्हाण यांनी मालवण पोलिसात तक्रार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे निलेश चव्हाण यांचा पूर्ण व्यवसाय अडचणी झाला आहे.
     चव्हाण कुटुंब यांचा उदरनिर्वाह सलून व्यवसायावर अवलंबून होता. या घटनेमुळे चव्हाण कुटुंब यांना मोठा धक्का बसला आहे. रात्री उशिरा आग लागण्याची घटना समजतात नगरपालिकेच्या बुलेट अग्निशामक बंब गाडीने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र डिझेल आणि पेट्रोल दुकानावर उचलल्याने संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. दुकानाच्या परिसरात डिझेल आणि पेट्रोल उचलल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते त्यामुळे अन्यथा विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता.

error: Content is protected !!