ठळक घडामोडी

ग्रा.पं. पोट निवडणूक; जिल्ह्यात सरासरी ५२.९९ टक्के मतदान!

घोणसरी, चौके, कालेली, माजगांव मध्ये थेट सरपंच पदासाठी रंगत

शांततेत मतदान प्रक्रिया पार; उद्या (२९ एप्रिल) मतमोजणी

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
      राज्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्य व थेट सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पोटनिवडणुक अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मंगळवार, २८ एप्रिल २०२६ रोजी मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली. जिल्ह्यात सरासरी ५२.९९ टक्के मतदान झाले.
     राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यात १३ ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले. थेट सरपंच पदासाठी ५ ग्रामपंचायतींमध्ये ११ उमेदवार रिंगणात असून सदस्य पदासाठी ९ ग्रामपंचायतींमध्ये २३ उमेदवारांमध्ये लढत रंगली. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली.
    सरपंच पदासाठी मतदान टक्केवारी
     कणकवली तालुक्यातील घोणसरी येथे ५२.९४%, मालवणमधील चौके येथे ५७.६०%, कुडाळमधील कालेली येथे ५९.५१% तर सावंतवाडीतील माजगांव येथे ४०.१२% मतदान झाले.
     सदस्य पदासाठी मतदान टक्केवारी
     कणकवलीतील दारिस्ते ६१.७१% व तळेरे ५९.१४%, मालवणमधील धामापूर ५९.०६% व वराड ७५.७३%, कुडाळमधील गावराई ५३.९४%, चेंदवण ५७.२२% व रानबांबुळी ६४.२६%, वेंगुर्ल्यातील मठ ६१.२४% तसेच सावंतवाडीतील नाणोस ५६.४९% असे मतदान झाले.
     जिल्ह्यात एकूण १२,७४३ मतदारांपैकी ६,७५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही किंवा मतदान यंत्र बदलण्याची वेळ आली नाही. संपूर्ण प्रक्रिया शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडल्याने जिल्हा प्रशासनाने मतदारांचे आभार मानले आहेत.
     दरम्यान, या पोटनिवडणुकीची मतमोजणी उद्या बुधवार, २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून संबंधित तहसील कार्यालयांमध्ये होणार आहे.

error: Content is protected !!