ठळक घडामोडी

कुडाळ हायस्कूलची गायत्री बागलकर कुडाळसह जिल्ह्यात प्रथम!

कुडाळ तालुक्याचा बारावीचा निकाल 97.72 टक्के

ओरोसची शुभ्रा प्रभूगावकर द्वितीय तर कुडाळची विद्यार्थीनी पुनम दळवी तालुक्यात तृतीय

कुडाळ : प्रतिनिधी
       महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी (एच.एस.सी) परीक्षेचा निकाल ऑनलाइन शनिवारी जाहीर करण्यात आला. कुडाळ तालुक्याचा बारावीचा निकाल 97.72 टक्के एवढा लागला. कुडाळ हायस्कूलच्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थीनी कु. गायत्री विवेकानंद बागलकर हीने 95.67 टक्के गुण मिळवून कुडाळ तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर ओरोस मधील डाॅन बाॅस्को स्कूलची विद्यार्थिनी शुभ्रा युगलकिशोर प्रभूगावकर हिने 94.83 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कुडाळ हायस्कूलच्या वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी पुनम दिनेश दळवी ही 94.17 टक्के गुणांसह तालुक्यात तृतीय आली.
      कुडाळ हायस्कूलचा निकाल 99.13 टक्के!
       कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, कुडाळचा निकाल 99.13 टक्के एवढा लागला. या कॉलेजच्या सर्व शाखांमधून 458 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी 454 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाखानिहाय निकाल – विज्ञान शाखा (100 टक्के) – प्रथम क्रमांक कु. द्राम हनुमंत लाड 92.5 टक्के, द्वितीय क्रमांक कु. आर्या अजय गावडे 86.33 टक्के, तृतीय क्रमांक कु. सुजल सिताराम परब 85.33 टक्के, वाणिज्य शाखा (98.78 टक्के) – प्रथम क्रमांक कु. गायत्री विवेकानंद बागलकर 95.67 टक्के, द्वितीय क्रमांक कु. पुनम दिनेश दळवी 94.17 टक्के, तृतीय क्रमांक कु. जान्हवी प्रसाद रावले 93.83 टक्के, कला शाखा (97.87 टक्के)  – प्रथम क्रमांक कु. सानिया एडवर्ड फर्नांडिस 83.5 टक्के, द्वितीय क्रमांक कु. पद्‌मनाभ सुरेंद्र मळगांवकर 81.67 टक्के, तृतीय क्रमांक कु. दिया उदय  गोसावी 80.17 टक्के, व्होकेशनल शाखा (100 टक्के) – प्रथम क्रमांक कु. वैशाली विठोबा तेंडोलकर 80 टक्के, द्वितीय क्रमांक कु. अदिती दत्ताराम तेंडोलकर  76.67 टक्के, द्वितीय क्रमांक कु. वैभवी नंदकिशोर परब 76.67 टक्के, तृतीय क्रमांक कु. मोहन श्रीकृष्ण खोत 73.17 टक्के. गायत्री बागलकर हिने वाणिज्य आयटी विषयात तर आर्या महेश परुळेकर हिने विज्ञान आयटी विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त केले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संस्था अध्यक्ष अॅड.हनुमंत सावंत तसेच संस्था पदाधिकारी का. आ. सामंत, ए. आर. शिरसाट, ए. ए. वैद्य, महेन्द्र गवस, एस. एस. चव्हाण, कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य विपीन वराडे, उपप्राचार्य नारारण साळवी, पर्यवेक्षक श्री. तेली सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले.
      पणदूर हायस्कूलचा बारावीचा निकाल ९८.६६ टक्के!
        वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर विद्यानगरी पणदूरतिठा या हायस्कूलचा बोर्ड परीक्षा इ. १२ वी (एच.एस.सी ) २०२६ चा निकाल ९८.६६ टक्के एवढा लागला. प्रशालेतून फेब्रुवारी मार्च २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता बारावी ( एच. एस. सी. ) परीक्षेत तिन्ही शाखेत मिळून एकूण २९९ विद्यार्थी बसले पैकी २९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला विभाग – प्रथम – कु.  साक्षी सुरेश वरक ५२२ / ८७.०० टक्के, द्वितीय – कु.  रेणुका राजन पावसकर ४३८ / ७३.०० टक्के, तृतीय – कु. ऐश्वर्या शिलवंत दुर्वे ४३१ / ७१.८३ टक्के. विज्ञान विभाग –
प्रथम – कु. वासुदेव विनायक बिले ५०८ / ८४.६७ टक्के,
द्वितीय – कु. भक्ती नागेश आईर ४९९ / ८३.१७ टक्के,
तृतीय – कु. वंदना मंगेश पवार ४९६ / ८२.६७ टक्के.
वाणिज्य विभाग – प्रथम – कु. प्राची प्रविण कदम ५११ / ८५.१७ टक्के, द्वितीय – कु. निशांत संतोष परब ४९६ / ८३.५० टक्के व तृतीय – कु. तन्वी संदिप शेलटे ४८७ / ८१.१७ टक्के. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था चेअरमन आपा गावडे, संस्था सचिव नागेंद्र परब, उपाध्यक्ष प्रकाश जैतापकर व संस्था पदाधिकारी संचालक, आणि मुख्याध्यापक एम. जी. कर्पे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
      जांभवडे हायस्कूलचा निकाल 100टक्के!
       न्यू शिवाजी हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स व एमसीव्हीसी विद्यालय जांभवडे हायस्कूलचा निकाल 100 टक्के लागला. कॉमर्स शाखा – प्रथम क्रमांक कु. सविधा सिताराम सावंत 78.83 टक्के, द्वितीय क्रमांक कु. अजय अर्जुन परब 78.50 टक्के, तृतीय क्रमांक कु. सानिका दिलिप सावंत  72.50 टक्के. विज्ञान शाखा – प्रथम क्रमांक कु. अनिता ऑस्टीन डिकोस्टा 60.50 टक्के, द्वितीय क्रमांक कु. शुभम अविनाश नाईक 56.00 टक्के, तृतीय क्रमांक कु. रश्मी विजय निकम 55.33 टक्के, एमसीव्हीसी शाखा – प्रथम क्रमांक धनंजय दिनकर जठार ७०.५० टक्के, द्वितीय क्रमांक गुरुदेव प्रकाश घाडीगावकर  ६४.६७ टक्के, तृतीय क्रमांक करण ज्ञानेश्वर मडव ६२.६७ टक्के.
      तुळसुली हायस्कूलचा निकाल 100 टक्के!
      तुळसुली कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला. वाणिज्य शाखा – प्रथम क्रमांक कु. अमृता जयसिंग तुळसुलकर 71 टक्के, द्वितीय क्रमांक कु. गौरवी दिनेश तुळसुलकर 70.50 टक्के, तृतीय क्रमांक कु. सेजल शंकर गावडे 67.17 टक्के कला शाखा निकाल 100 टक्के प्रथम क्रमांक कु. अंकिता महेश वारंग 70.50 टक्के, द्वितीय क्रमांक कु. तृप्ती शंकर आमणेकर 66.67 टक्के, तृतीय क्रमांक कु. सपना चंद्रकांत जाधव 63.33 टक्के.
       पाट हायस्कूलचा निकाल 98.70 टक्के!
      पाट कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 98.70 टक्के लागला. विज्ञान विभागाचा निकाल शंभर टक्के वाणिज्य विभागाचा निकाल शंभर टक्के तर कला विभागाचा निकाल ९१.६६ टक्के लागला असून विज्ञान मधून कुमारी सामंत अर्पिता अमेय हि 83 टक्के गुण मिळवून प्रथम आली तर कुमारी परब दीक्षा शंकर 74.83 टक्के गुण मिळवून द्वितीय आणि शाल्मली शंकर घोगळे 74.33 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. विज्ञान शाखेचा 66 मुलांपैकी 66 विद्यार्थी पास होऊन निकाल शंभर टक्के लागला. वाणिज्य विभागामधून प्रथम क्रमांक अथर्व उत्तम पाटकर 82.33 टक्के, रिया राजन पाटकर 79.83 टक्के तर वैभव वासुदेव वझरकर 78.67 टक्के गुण मिळवून तृतीय आला. वाणिज्य विभागातून 64 विद्यार्थी सहभागी झाले होते. हा निकाल सुद्धा शंभर टक्के लागला तर कला विभागामध्ये प्रथम प्रियांका गोविंद आरोलकर 77.83 टक्के, वेदश्री ज्ञानेश्वर परब 59.17 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर लाडू मधुकर पाटील 56 टक्के गुण मिळवून तृतीय आला.
      साळगाव हायस्कूलचा निकाल 88 टक्के!
      साळगाव हायस्कूलचा बारावीचा निकाल 88 टक्के लागला असून विद्यार्थिनींनी दिमाखदार यश संपादन करत शाळेची मान उंचावली आहे. प्रथम क्रमांक निकिता वासुदेव देवळी 72.67 टक्के, द्वितीय क्रमांक कोमल प्रशांत चव्हाण  66 टक्के, तृतीय क्रमांक वैष्णवी वासुदेव गडकर 61 टक्के. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक सलीम तकीलदार, संस्थेचे अध्यक्ष मुकुंद धुरी, सचिव प्रदीप तेंडोलकर, सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!