सुधांशू धुरी 99.60 टक्के गुण मिळवत प्रशालेत प्रथम
गुणवंत विद्यार्थ्यांचा अभिनंदनपर सत्कार
कुडाळ : प्रतिनिधी
कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या कुडाळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत एस् एस् सी बोर्ड परीक्षेत उत्तम यश प्राप्त केले आहे . शाळेचा एकूण निकाल 98.55 टक्के एवढा लागला .
हायस्कूलच्या सुधांशू महेश धुरी याने 99.60 टक्के गुण प्राप्त करीत शाळेत प्रथम तर जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला. गुणानुक्रमे समृद्धी विलास सरनाईक , आर्या लक्षण आगलावे आणि वरदा भाग्यविधाता वारंग यांनी 98 % गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या तर आयुषी सगुण केळूसकर हिने 97 % गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला. एकूण 14 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. या परीक्षेला एकूण 208 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते . पैकी 205 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचा निकाल 98.55 % एवढा लागला. संस्कृत विषयात पूर्ण गुण घेणारे विद्यार्थी 7 आहेत .
संस्था आणि प्रशालेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. गुणवंत विद्यार्थ्यांचे पालकही या प्रसंगी उपस्थित होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट , उपाध्यक्ष का. आ. सामंत , सरकार्यवाह अनंत वैद्य , सहकार्यवाह महेंद्र गवस, सीईओ सुरेश चव्हाण यांनी तर प्रशालेचे मुख्याध्यापक विपिन वराडे , पर्यवेक्षक रंजन तेली , ज्यु कॉलेजचे उपमुख्याध्यापक नारायण साळवी , शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी , पालक यांनी अभिनंदन केले आहे.









