

भडगाव बुद्रूक येथे घरावर माड कोसळला; अनिल कदम यांचे मोठे नुकसान
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यात आज शनिवारी सायंकाळी पुन्हा एकदा वीज गडगडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. भडगाव बुद्रूक येथील अनिल कदम यांच्या घरावर लगतचे माडाचे झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले.
गेले सलग तीन दिवस सायंकाळच्या सत्रात अवकाळी पाऊस पडत असून सायंकाळी पावणे चार वाजण्याच्या सुमारास ग्रामीण भागात अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यानंतर वीजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. भडगाव बुद्रूक परिसरात वादळी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने अनिल कदम यांच्या घरावर माड पडला. यात घराच्या छपरासह अंगणातील मंडपाचेही मोठे नुकसान झाले.









